आणखी दोघांचा मृत्यू; १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 01:13 PM2020-10-03T13:13:07+5:302020-10-03T13:13:17+5:30

CoronaVirus in Akola २४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Two more died; 10 new Corona positive patients were found |   आणखी दोघांचा मृत्यू; १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

  आणखी दोघांचा मृत्यू; १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, ३ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४३ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७५८९ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १० अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये बाळापूर, राजपुतपुरा, अमीनपूरा, बापू नगर, श्रद्धा रेसिडेन्सी कौलखेड रोड, राम नगर, तेल्हारा, पोही लंगापूर, केशव नगर व सातरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.

गीतानगर, रामदासपेठेतील दोघे दगावले
शनिवारी कोरोनावर उपचार सुरु असलेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये गोविंदकुंज अपार्टमेन्ट, रामदास पेठ, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष व गीता नगर, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २२ व ३० सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


१,१३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,५८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६२०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Two more died; 10 new Corona positive patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app