अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी, ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:31 IST2021-02-09T13:31:09+5:302021-02-09T13:31:24+5:30
CoronaVirus News जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३४० झाली आहे.

अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी, ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणार्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३४० झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ५९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ११,९२१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर आणि अकोट येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, मोठी उमरी, तोष्णीवाल ले आऊट येथील प्रत्येकी चार, बाभुळगाव, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, सहकार नगर, केडीया प्लॉट, हिवरखेड येथील प्रत्येकी दोन, राऊतवाडी, बार्शीटाकळी, कलाल ची चाळ, गुडधी, तापडीया नगर, गोडबोले प्लॉट, न्यु तापडीया नगर, पातूर, जुने शहर, कैलास टेकडी, न्यु भागवत प्लॉट, जवाहर नगर, गंगानगर, सिव्हील लाईन, गीता नगर, बोरगाव मंजू, जीएमसी, निंभोरा, ओम सोसायटी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये कापशी येथील एका ६७ वर्षीय महिला व सुकळी ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांना अनुक्रमे १ व ६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
८६७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,९२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ८६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.