म्हैसपूर ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र

By Admin | Updated: March 26, 2016 02:29 IST2016-03-26T02:29:07+5:302016-03-26T02:29:07+5:30

अपर जिल्हाधिका-यांचा आदेश: शौचालय नसल्याने गेले सदस्यत्व.

Two members of the Mhaaspur Gram Panchayat are ineligible | म्हैसपूर ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र

म्हैसपूर ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र

अकोला: शौचालय नसल्याने म्हैसपूर ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश अपर जिल्हाधिकार्‍यांनी १६ मार्च रोजी दिला. त्यामुळे घरी शौचालय नसल्याने, ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना सदस्यत्व गमवावे लागले.
अकोला तालुक्यातील म्हैसपूर ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ६ ऑगस्ट २0१५ रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून अनुसूचित जाती या राखीव प्रवर्गातून दिलीप तुकाराम वानखडे सदस्य म्हणून निवडून आले. तसेच प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जाती स्त्री राखीव प्रवर्गातून मीना संतोष इंगळे निवडून आल्या. निवडून आलेल्या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वत:च्या जागेतील घरी शौचालय नाही. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत गावामध्ये सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१)(ज-५) अन्वये दोन्ही सदस्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी याचिका म्हैसपूर येथील सरपंच सविता सारंगधर इंगळे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली होती. या प्रकरणात गत १0 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्याचे स्पष्ट झाल्याने आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ वे कलम १४ (ज-५) नुसार भंग केल्याने म्हैसपूर ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप वानखडे व सदस्य मीना इंगळे यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात येत आहे, असा आदेश अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी १३ मार्च रोजी पारित केला. त्यामुळे घरी शौचालय नसल्याने ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचे सदस्यत्व गेले.

Web Title: Two members of the Mhaaspur Gram Panchayat are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.