ट्रक दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:42 IST2017-10-16T19:41:40+5:302017-10-16T19:42:48+5:30
भरधाव ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना बाळापूर न्यायालयासमोर १६ ऑक्टोबर रोजी घडली. पातूर-बाळापूर मार्गावर ट्रक क्र.आरजे 0६ जीबी २६१७ ने समोरुन येत असलेल्या दुचाकी क्र.एमएच ३0 डब्ल्यू ४२६६ ला जबर धडक दिली

ट्रक दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : भरधाव ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना बाळापूर न्यायालयासमोर १६ ऑक्टोबर रोजी घडली.
पातूर-बाळापूर मार्गावर ट्रक क्र.आरजे 0६ जीबी २६१७ ने समोरुन येत असलेल्या दुचाकी क्र.एमएच ३0 डब्ल्यू ४२६६ ला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार श्रीकृष्ण शेषराव म्हैसने (४४) हा जागीच ठार झाला. या अपघातामुळे ट्रक उलटल्याने रस्त्याने पायी जात असलेले विष्णू गोविंद घोगे रा.कोळासा व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जखमी असलेल्या इसमाचा मृत्यू झाला. उमेश म्हैसने यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रकचालकाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी म्हैसने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९,३0४ अ, १८८ एमव्ही अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.