ट्रॅक्टर पलटी होऊन दोन जणांचा मृत्यू; बार्शीटाकळीमधील पुनोतीनजीकची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 12:13 IST2022-11-11T12:12:56+5:302022-11-11T12:13:18+5:30
मृतकांमध्ये बार्शीटाकळी शहरातील रहिवाशी असलेले दिनेश सावध (वय 33 वर्ष) व रीयान खान (वय 22 वर्ष) यांचा समावेश आहे.

ट्रॅक्टर पलटी होऊन दोन जणांचा मृत्यू; बार्शीटाकळीमधील पुनोतीनजीकची घटना
बार्शीटाकळी:- पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धाबा ते पुनोती रोडवर पुनोतीनजीक ड्रीमलँड कॉलेज जवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोघे ठार झाले. ही घटना १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान घडली.
पोलिसानी दिलेल्या महिती नुसार,धाबा ते पुनोती रोडवर पुनोती बु नजीक क्रशर रेती( डच) खाली करून परत जाणारा ट्रॅक्टर ड्रीमलँड कॉलेज जवळ पलटी झाला. या घटनेत दोघे ठार झाले. ही घटना १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. मृतकांमध्ये बार्शीटाकळी शहरातील रहिवाशी असलेले दिनेश सावध (वय 33 वर्ष) व रीयान खान (वय 22 वर्ष) यांचा समावेश आहे.