एसटी-ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात दोन ठार

By Admin | Updated: March 1, 2015 21:17 IST2015-03-01T21:17:21+5:302015-03-01T21:17:21+5:30

अकोल्याजवळ रांजदा फाट्याजवळची घटना; १0 जण गंभीर जखमी.

Two killed in a horrific accident of ST-autorickshaw | एसटी-ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात दोन ठार

एसटी-ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात दोन ठार

चिखलगाव (जि.अकोला) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणार्‍या अँपे ऑटोरिक्षाला राजंदा फाट्यानजीक जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षातील दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर १0 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
एमएच ३0 टी-८४९0 क्रमांकाचा अँपे ऑटोरिक्षा रविवारी दुपारी अकोल्याहून चिंचोली रुद्रायणीकडे जात असताना राजंदाफाट्याजवळ पातूरकडून अकोल्याकडे येणार्‍या एम.एच.0७ सी-९४२२ क्रमांकाच्या वाशिम-शेगाव एस.टी.बसने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात या अँपे ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ऑटोरिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला. यावेळी ऑटोरिक्षातून १२ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात ऑटोरिक्षातून प्रवास करणार्‍यांपैकी चिखलगाव येथील आनंद व्यंकटराव थोरात (६0), चिंचोली रुद्रायणी येथील पूजा काशीनाथ वर्गे (१५) हे दोन प्रवासी जागीच ठार झाले तर चिखलगाव येथील गुणवंत थोरात (४0), वैभव गुणवंत थोरात (१५), चिंचोली रुद्रायणी येथील पल्लवी वर्गे (११), योगिता शिवराम वर्गे (३0), उमेश नारायाण पराडे (२८), मंगला उमेश पराडे (२७), खामखेड येथील गुरुदेव मते (३0), मेहकर येथील धनाबाई रामचंद्र सरसरे (४0), म्हैसपूर येथील सावित्रीबाई गजानन उन्हाये (३0) व वाघजाळी येथील ऑटोरिक्षाचालक रणजित राठोड (३0) हे गंभीर जखमी झाले.शुभम उमेश पराडे हा तीन वर्षीय बालक या अपघातातून सुखरुप बचावला. जखमींना उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात होताच एसटी बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू होती.

Web Title: Two killed in a horrific accident of ST-autorickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.