मालवाहू गाडीची धडक; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:00 IST2020-07-04T10:57:18+5:302020-07-04T11:00:01+5:30
या अपघातामध्ये दुचाकीवरील तारसिंग राठोड ही वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली.

मालवाहू गाडीची धडक; दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठा : निंबा फाट्यावरून शेगावकडे जात असलेल्या मालवाहू गाडीने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना, शुक्रवारी ३ जुलै रोजी निंबा ते शेगाव मार्गावर कवठ्यानजीक घडली. याप्रकरणी उरळ पोलीस स्टेशनमध्ये मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंबा ते शेगाव मार्गावर निंबा फाट्यावरून शेगावकडे जात असलेला मालवाहू क्रमांक एमएच २८ बीबी २६२० त्याच्या विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी क्रमांक एम एच ३० एजी ७२८२ ला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तारसिंग राठोड ही वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली. गंभीर जखमी असलेला दुचाकीचालक सुरेशचंद राठोड यास रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघात होताच मालवाहू वाहनाचा चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी उरळ पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)