दोनशे गावांत हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रकोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:19 IST2019-01-09T12:19:06+5:302019-01-09T12:19:15+5:30
अकोला : राज्यातील हरभरा पिकावर घाटेअळी व मर या कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला असून, यातील २०२ गावांमध्ये घाटेअळीचा प्रकोप आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्याने कृषी विभागाने या अळीच्या नियंत्रणासाठी १८.१४ लाख शेतकºयांना ‘एसएमएस’ पाठविले.

दोनशे गावांत हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रकोप!
अकोला : राज्यातील हरभरा पिकावर घाटेअळी व मर या कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला असून, यातील २०२ गावांमध्ये घाटेअळीचा प्रकोप आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्याने कृषी विभागाने या अळीच्या नियंत्रणासाठी १८.१४ लाख शेतकºयांना ‘एसएमएस’ पाठविले, तसेच कपाशीवरील गुलाबी बोंडअळी २३ गावांत नुकसान पातळीच्यावर आढळून आली आहे.
हरभरा पीक फुलोºयावर असून, याच अनुषंगाने कृषी विभागाने २ जानेवारीपर्यंत राज्यातील हरभरा क्षेत्राचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २०२ गावांत हरभरा पिकावर घाटेअळी व मर या कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने १८.१४ लाख शेतकºयांना एसएमएस पाठविले आहेत. राज्यात उशिरा लागवड केलेल्या गावात ६६९ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील २३ गावांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर दिसून आला.
दरम्यान, राज्यातील रब्बीच्या ५६.९३ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत ३०.४४ लाख हेक्टर म्हणजेच ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.