पावसामुळे पंचशील वाडी येथे दोन घरे कोसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST2021-06-16T04:26:49+5:302021-06-16T04:26:49+5:30
विद्युत तारांऐवजी केबलचा वापर करावा मूर्तिजापूर: महावितरण कंपनीने सर्व्हिस इलेक्ट्रिक तार लाईन काढून केबल पद्धत वापरावी अशी मागणी माजी ...

पावसामुळे पंचशील वाडी येथे दोन घरे कोसळली!
विद्युत तारांऐवजी केबलचा वापर करावा
मूर्तिजापूर: महावितरण कंपनीने सर्व्हिस इलेक्ट्रिक तार लाईन काढून केबल पद्धत वापरावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
पंचशील वाडी,रोशन पुरा, मातंगपुरा भागात दाट वस्ती आहे. या भागातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ मिळाला असून घरकूल बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची वेगळी जागा उपलब्ध नसल्याने घरकूल बांधकाम दुसऱ्या मजल्यावर केले आहे. परिसरात महावितरणची सर्व्हिस लाईन टाकलेली आहे. ती लाईन घरांना स्पर्श करीत असल्याने विजेचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सर्व्हिस लाईनचे तार काढून केबल तार टाकण्यात यावी. अशी मागणी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे.