Two goons from Akola district were deported for two years | अकोला जिल्ह्यातील दोन गुंड दोन वर्षांसाठी हद्दपार

अकोला जिल्ह्यातील दोन गुंड दोन वर्षांसाठी हद्दपार

अकोला : जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसावा याकरिता मूर्तिजापूर शहरातील एका गुन्हेगारी टोळीतील दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे, जिल्हा अकोलाचे प्रभारी अधिकारी यांनी मूर्तिजापूर शहर हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार संजय व्यंकट गुंजाळ (४२) व सुनील रामा गुंजाळ (३९) दोन्ही राहणार वडरपुरा, मूर्तिजापूर यांना हद्दपार केले आहे. या दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांच्या विरुद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने गुरुवारी पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केल्याबाबतचा आदेश देण्यात आला असून, नमूद दोन्ही गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांचे हद्दपार प्रस्ताव तयार करून त्यांना अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिली.
 

 

Web Title: Two goons from Akola district were deported for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.