जिल्ह्यात उद्या चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:35+5:302021-02-05T06:19:35+5:30
० ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थी - १.२६ लाख पोलिओ डोज प्राप्त - २ लाख २५ हजार ४८७ एकूण ...

जिल्ह्यात उद्या चिमुकल्यांना ‘दोन थेंब जीवनाचे’
० ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थी - १.२६ लाख
पोलिओ डोज प्राप्त - २ लाख २५ हजार ४८७
एकूण बुथ - १,४०१
अशी चालेल मोहिम
मोबाईल पथक - ९६
ट्रान्झिट पथक - ३०
लसीकरणाची वेळ - सकाली ८ ते सायं. ५
पल्स पोलिओ लस प्राप्त
जिल्ह्यात पल्स पोलिओची एकूण २ लाख २५ हजार ४८७ डोज प्राप्त झाले. त्यापैकी ७१ हजार डोज महापालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगाटातील चिमुकल्यांसाठी आहे.
मोहिमेंतर्गत सर्वच शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी पोलिओ लसीकरण केले जाईल. तसेच आशा आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ लस देणार आहे.
पोलिओ लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना रविवार ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओचे ‘दोन थेंब जीवनाचे’ द्यावे.
- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला