Two bikes hit face to face; Two serious | दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन गंभीर
दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन गंभीर

बाळापूर : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बाळापूर ते पारस फाट्यादरम्यान ११ जानेवारी रोजी दुपारी घडली. अरविंद समाधान सिरसाट व मो.सोहेल अनिस अहमद असे गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
अरविंद सिरसाट रा.बाळापूर हा दुचाकी क्र.एमएच ३० आर ५३४३ ने पारस फाट्याकडे जात होता. दरम्यान, समोरुन येत असलेली दुचाकी क्र. एमएच ३० एसी ००१७ व सिरसाट यांच्या दुचाकीदरम्यान जबर धडक झाली. या अपघातात अरविंद सिरसाट व मो.सोहेल अनिस अहमद हे गंभीर जखमी झाले तर मो.आकीब अब्दुल अकीब हा जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती, की दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तातडीने बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)


Web Title:  Two bikes hit face to face; Two serious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.