अडीच वर्षीय बालकाचे अपहरण, नरबळीचा प्रयत्न; नायगाव परिसरातील घटना, आराेपी अटकेत

By सचिन राऊत | Published: February 26, 2024 12:54 AM2024-02-26T00:54:20+5:302024-02-26T00:54:30+5:30

पाेलिसांनी आराेपीस अटक करून न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

Two-and-a-half-year-old child kidnapped and attempted human sacrifice, incident in Naigaon area, arrestee arrested | अडीच वर्षीय बालकाचे अपहरण, नरबळीचा प्रयत्न; नायगाव परिसरातील घटना, आराेपी अटकेत

अडीच वर्षीय बालकाचे अपहरण, नरबळीचा प्रयत्न; नायगाव परिसरातील घटना, आराेपी अटकेत

सचिन राऊत, अकोला: आकाेट फैल परिससरातील नायगाव येथील एका अडीच वर्षीय बालकाचे दाेन वेळा अपहरण करीत या बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न याच परिसरातील एका आराेपीने केल्याची घटना रविवारी उजेडात आली. या प्रकरणी आकाेट फैल पाेलिसांनी आराेपीस अटक केली असून त्याला न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने पाेलिस काेठडी सुनावली आहे.

नायगाव परिसरातील मीलन नगर येथील रहीवासी मोहम्मद मीर आलम मोहम्मद मोइन (३४,वर्ष) यांनी आकाेट फैल पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशीरा दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा सकाळी ९ वाजता घरासमाेर खेळत हाेता. यावेळी आराेपी यार मोहम्मद लाल मोहम्मद आणि त्यांचा मुलगा या दाेघांनी माेहम्मद मीर आलम माे. माइन यांच्या अडीच वर्षीय मुलाला जबरदस्तीने दुचाकी बसवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी माे. मीर आलम यांनी त्याला राेखण्याचा प्रयत्न केला असता आराेपी यार माेहम्मद लाल माेहम्मद याने फीर्यादीस शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी आकाेट फैल पाेलिसांनी आराेपी यार माेहम्मद लाल माेहम्मद याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३६४, ३२३, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पाेलिसांनी आराेपीस अटक करून न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

यापूर्वीही केला हाेता प्रयत्न

मोहम्मद मीर आलमने दिलेल्या तक्रारीनुसार यापुर्वी २० फेब्रुवारी राेजीही त्यांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला हाेता. यावेळी याच आराेपींनी त्यांच्या अडीच वर्षीय मुलाला माेर्णा नदीकाठावर नेत मारहाण केली हाेती. मात्र त्यावेळीही हा प्रयत्न अयशस्वी झाला हाेता. नंतर पुन्हा २४ फेब्रूवारी राेजी तसाच प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमुद आहे.

Web Title: Two-and-a-half-year-old child kidnapped and attempted human sacrifice, incident in Naigaon area, arrestee arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.