तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड
By सचिन राऊत | Updated: June 6, 2024 21:33 IST2024-06-06T21:33:14+5:302024-06-06T21:33:26+5:30
तीन दुचाकी चाेरी प्रकरणात हाेते फरार

तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड
अकाेला : सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चाेरी प्रकरणात फरार असलेल्या दाेन आराेपींना सुमारे तीन वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. हे आराेपी तीन दुचाकी चाेरी प्रकरणात तीन वर्षांपासून फरार हाेते.
हैदरपुरा येथील रहीवासी शाहरूख खान सलीम खान वय ३२ वर्ष, सैय्यद समीर सै. सलीम वय २३ वर्ष,रा. राजू नगर आकाेट फैल या दाेघांना सिटी काेतवाली पाेलिसांनी ताब्यात घेतले. दुचाकी चाेरी प्रकरणात त्यांना विचारपुस केली असता दाेन्ही आराेपींनी तीन दुचाकी चाेरी प्रकरणाची कबूली दिल्याची माहीती आहे.
या दाेन चाेरटयांविरुध्द तीन दुचाकी चाेरी प्रकरणाचे गुन्हे दाखल असून त्यांच्या चाेरीतील दुचाकी जप्त करण्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी, ठाणेदार सुनील वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र बहादुरकर, शेख ख्वाजा, अमीत दुबे, निलेश बुंदे, कीशाेर येउल, माजीद पठान यांनी केली.