शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

तुषार पुंडकर हत्याकांड : हल्लेखोरांना ओळखणारा गवसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 1:02 PM

दुचाकीवर एक सडपातळ व जाड बांधा असलेला असे दोन इसमांना पळताना एका पोलीस कर्मचाºयाने प्रत्यक्ष पाहिले.

- विजय शिंदेअकोट: प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर बेछूट गोळीबार करून पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना ओझरते ओळखणारा प्राथमिक साक्षीदार पोलिसांना गवसला असल्याचे समजते. त्यामुळे हल्लेखोराचे वर्णनात्मक व्यक्तिचित्र व इतर बाजू जाणून घेण्याकरिता प्राथमिक साक्षीदाराला घेऊन पोलिसांचे एक पथक अकोटवरून पुणे येथे दाखल झाल्याची माहिती पुढे येत आहे. आठवडा उलटूनही या हत्याकांडाचा उलगडा झाला नाही.स्थानिक पोलीस वसाहतीत पुंडकर यांची २१ फेब्रुवारीला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावेळी घटनास्थळावरून दुचाकीवर एक सडपातळ व जाड बांधा असलेला असे दोन इसमांना पळताना एका पोलीस कर्मचाºयाने प्रत्यक्ष पाहिले. ज्या ज्या रस्त्यावर हे हल्लेखोर निघाले त्याला तपासून शहरातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक लोकांशी संवाद साधून २१ फेब्रुवारीला रात्रीच्या वेळी कोणी संशयास्पद अशा दोन इसमांना पडताना पाहिले काय, याची माहिती घेतली. या माहिती संकलनामध्ये घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका बँकेजवळ दुचाकीचा पावरफुल लाइट लावून दोन इसम पळून जाताना एक -दोन जणांनी पाहिले. शिवाय दुचाकी घेऊन पळून जाणाºयांचा मोबाइलसुद्धा खाली पडला आणि मोबाइल उचलण्यासाठी त्यांनी संवाद केल्याचे ऐकले, अशीही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. या माहितीच्या आधारावर तपास करणाºया पोलीस अधिकाºयांनी खातरजमा करून घेण्याचा प्रयत्न केला. या प्राथमिक माहितीगार सूत्राने दुचाकीस्वारांना पळून जाताना ओझरते पाहिले असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पळून गेलेल्या इसमाचे परफेक्ट वर्णन जाणून घेण्याकरिता उच्चस्तरीय फॉरेन्सिक लॅबमध्ये एक पोलीस पथक माहितीगार सूत्राला घेऊन गेल्याचे समजते. या फॉरेन्सिक लँबमधील संशयीत हल्लेखोरांच्या वर्णनाची पोलिसांना प्रतीक्षा असून, अजूनपर्यंत गावठी पिस्टल, काडतुस व इतर घटनास्थळावरील तपासणीचे अहवाल आले किंवा नाही? यांची माहिती पोलिसांनी जाहीरपणे स्पष्ट केली नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीakotअकोट