महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू कार्र्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:19+5:302021-02-05T06:20:19+5:30

जलवाहिनीला गळती अकाेला : जुने शहरातील कामगार कल्याण मंडळ कार्यालयासमाेर जलवाहिनीला गळती लागून माेठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. जलवाहिनीच्या ...

Turmeric program by Women's Front | महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू कार्र्यक्रम

महिला आघाडीतर्फे हळदीकुंकू कार्र्यक्रम

जलवाहिनीला गळती

अकाेला : जुने शहरातील कामगार कल्याण मंडळ कार्यालयासमाेर जलवाहिनीला गळती लागून माेठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी साेमवारी या ठिकाणी माेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. मुख्य रस्त्यालगत हा खड्डा असून वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड न लावल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

सिव्हील लाइन्स चाैकात खाेदला खड्डा!

अकाेला : शहरातील वर्दळीच्या असलेल्या सिव्हील लाइन्स चाैकात मुख्य रस्त्यालगत भलामाेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. ‘अमृत’अभियान अंतर्गत जलवाहिनीच्या जाेडणीसाठी खड्डा खाेदण्यात आला असून रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने हा खड्डा बुजविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांची चर्चा फिस्कटली

अकाेला : सहाव्या वेतन आयाेगाच्या फरकाची रक्कम, रजा राेखीकरण, कालबध्द पदाेन्नती व सातवा वेतन आयाेग लागू करण्याच्या मुद्यावर मनपातील सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदाेलनाचा इशारा देण्यात आला हाेता. त्यावर आयुक्तांनी ताेडगा काढण्याचे आश्वासन दिले. या मुद्यावर संघटनेने पुन्हा आयुक्तांसाेबत चर्चा केली असता ठाेस मार्ग निघाला नसल्याची माहिती आहे.

प्रभाग २० मध्ये घाणीचे साम्राज्य

अकाेला : मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २० मधील खडकी व परिसरात मूलभूत सुविधांचा बाेजवारा उडाला आहे. नाले, गटारांची नियमित साफसफाई हाेत नसल्यामुळे डासांची पैदास वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकाराकडे भाजपचे नगरसेवक तसेच मनपाचे आराेग्य निरीक्षक दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मुख्य रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांलगत व चाैकांमध्ये भाजी, फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण थाटल्याचे दिसून येत आहे. संत तुकाराम चाैकात भाजी विक्रेत्यांनी बाजार मांडला आहे. येवता, विझाेरा, कानशिवनी येथून प्रवासी व अवजड वाहतूक मलकापूर भागातून शहरात दाखल हाेत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे.

बापू नगरमध्ये सुविधांचा अभाव

अकाेला : अकाेटफैल भागातील बापू नगर व रेल्वे क्वाॅर्टरमध्ये मागील काही दिवसांपासून मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिसरात मनपाचे साफसफाई कर्मचारी तसेच नगरसेवक फिरकत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

‘मच्छी मार्केटमध्ये सुविधा पुरवा’

अकाेला : अकाेटफैल परिसरातील मुख्य रस्त्यांलगत उघड्यांवर मांस विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. या भागातील मच्छी मार्केटमध्ये जागेचा अभाव असल्यामुळे व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यासाेबतच मच्छी मार्केटमध्ये सुविधा देण्याची मागणी हाेत आहे.

हिंगणा भागात पाणीटंचाई

अकाेला : मनपाच्या हद्दवाढ क्षेत्रातील हिंगणा भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून मूलभूत सुविधांचा बाेजवारा उडाला आहे. तसेच परिसरात रस्त्यांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रहिवाशांना अडचणीला सामाेरे जावे लागत आहे. मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतरही हिंगणा येथे मूलभूत सुविधांची पूर्तता न केल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

जलवाहिनीच्या कामाला वेग

अकाेला : प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या हद्दवाढ क्षेत्रातील डाबकी येथे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशातून मनपा प्रशासनाच्यावतीने मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जलवाहिनीला रेल्वे रुळाचा अडसर दूर झाला असून मनपाने रेल्वे प्रशासनाकडून परवानगी घेतल्यानंतर कामाला सुरुवात केली आहे.

अमरप्रीत काॅलनीमध्ये नाल्या तुंबल्या

अकाेला : मनपाच्या बांधकाम विभागाने प्रभाग क्रमांक ८ मधील अमरप्रीत काॅलनीमध्ये नाल्यांची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे या भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सांडपाणी साचल्यामुळे डासांची पैदास वाढली असून स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. भाजप नगरसेवकांनी ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.

Web Title: Turmeric program by Women's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.