ट्रक-टँकरला धडकला, एक जखमी

By Admin | Updated: May 28, 2017 03:50 IST2017-05-28T03:50:36+5:302017-05-28T03:50:36+5:30

दक्षतानगर चौकात अपघात

Truck-tanker shocked, one injured | ट्रक-टँकरला धडकला, एक जखमी

ट्रक-टँकरला धडकला, एक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नेहरू पार्क चौकाकडून वाशिम बायपासकडे येत असलेल्या टँकरला मध्यवर्ती बसस्थानकावरून येणार्या ट्रकने दक्षतानगर चौकात जबर धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात एक जण जखमी झाला असून, हा अपघात प्रचंड विचित्र असल्याची माहिती प्रत्यक्षदश्रीनी दिली.
खदान पोलीस ठाण्यासमोर असलेल्या दक्षतानगर चौकात मध्यवर्ती बसस्थानकाकडून येणारी वाहने काहीही न बघता थेट वाशिम बायपासकडे वेगाने वळतात, तर याच मार्गावर नेहरू पार्ककडून येणारी वाहनेही जोरात येत असल्याचे दिसून येते. दोन्ही वाहने एकाचवेळी वेगात आल्याने विचित्र अपघात घडला. यामध्ये एक जण जखमी झाला असून, घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी धाव घेतली. तातडीने रोडवरील ट्रक आणि टँकर बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Truck-tanker shocked, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.