ट्रक-शिवशाही बसची धडक; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 01:23 IST2018-08-09T01:23:28+5:302018-08-09T01:23:53+5:30

माना ते मूर्तिजापूरदरम्यान नागठाणा गावाजवळ ट्रक व शिवशाही बसची धडक होऊन सात जण जखमी झाल्याची घटना ८ आॅगस्टच्या रात्री घडली.

Truck-Shivshahi bus hits; Seven injured | ट्रक-शिवशाही बसची धडक; सात जखमी

ट्रक-शिवशाही बसची धडक; सात जखमी

मूर्तिजापूर: माना ते मूर्तिजापूरदरम्यान नागठाणा गावाजवळ ट्रक व शिवशाही बसची धडक होऊन सात जण जखमी झाल्याची घटना ८ आॅगस्टच्या रात्री घडली. या अपघातातील चार जखमींना मूर्तिजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर तीन जखमींना अकोल्यास पाठविण्यात आले.
अमरावतीवरून अकोल्याकडे जाणाऱ्या जीजे ०३ बीव्ही १९५४ क्रमांकाच्या ट्रकची व नागपूूरहून शेगावकडे जाणाºया एमएच ०९ ईएम १५२२ क्रमांकाच्या शिवशाही बसची जोरदार धडक बुधवारी रात्री माना ते मूर्तिजापूरदरम्यान नागठाणा गावाजवळ घडली. या अपघातात सात जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर तीन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यास पाठविण्यात आले आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वाहतूक ठप्प झाली होती. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते.

Web Title: Truck-Shivshahi bus hits; Seven injured

टॅग्स :Akolaअकोला