लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव जहा. (अकोला) : राख घेऊन जात असलेला ट्रक उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. सलमान खान अय्युब खान (२६) असे मृतकाचे नाव आहे, तर शे. महेबुब शे. कालू (४0), बब्बू खान (४५), शे. अकील शे. रउफ (२९), शे. नफीस शे. खालीब, जयमाला सोनोने, बाबूराव चव्हाण आदी जखमी झाले आहेत. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
राष्ट्रीय महामार्गावर राखेचा ट्रक उलटला; एक ठार, सहा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:38 IST
राख घेऊन जात असलेला ट्रक उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली.
राष्ट्रीय महामार्गावर राखेचा ट्रक उलटला; एक ठार, सहा गंभीर
ठळक मुद्देबाभूळगाव जहागीर येथील घटनारस्त्याने जाणारा मजूर दबल्याने जागीच ठार