भरधाव ट्रक झाडावर धडकला : १ ठार , तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:39 PM2018-06-12T14:39:04+5:302018-06-12T14:39:04+5:30

truck hit a tree: 1 killed, three injured | भरधाव ट्रक झाडावर धडकला : १ ठार , तीन जखमी

भरधाव ट्रक झाडावर धडकला : १ ठार , तीन जखमी

Next
ठळक मुद्देआयशर मधील योगेश समाधान राऊत (वय 32वर्ष) राहाणार जळगाव जामोद हा जागीच ठार झाला. जळगावचेच आकाश जावरकर(२२), गजानन बावस्कर(५७) व चालक वैभव आढाव जखमी झाले. पूढील उपचारासाठी त्यांना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले असून गजानन बावस्कर अत्यवस्थ आहेत.

 

मूर्तिजापूर,ता.१२ : कारंजा रस्त्यावरील जामठी (खूर्द) जवळ भरधाव आयशर ट्रक रस्त्याच्या कडेच्या लिंबाच्या झाडावर धडखल्यामुळे झालेल्या अपघातात आज सकाळी(ता.१२) एकजण ठार, चालकासह तिघे जखमी झाले.
            पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहाच्या दरम्यान हिंगणघाट वरून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या आयशर (क्रमांक एम एच २८ए बी७९५०) वाहनचालकाने आपले वाहन बेजबाबदारीने व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेच्या कडूलिंबाच्या झाडाला जबर धडक दिली. त्यामुळे आयशर मधील योगेश समाधान राऊत (वय 32वर्ष) राहाणार जळगाव जामोद हा जागीच ठार झाला. जळगावचेच आकाश जावरकर(२२), गजानन बावस्कर(५७) व चालक वैभव आढाव जखमी झाले. जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पूढील उपचारासाठी त्यांना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले असून गजानन बावस्कर अत्यवस्थ आहेत.
              येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि च्या २७९, ३३७, ३३८ , ३०४ ए व सह कलम १८४  मोटार व्हीकल अॉक्ट प्रमाणे वाहन चालक वैभव आढाव विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार एपीआय नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनात  एएसआय गणेश चोपडे करीत आहेत.

Web Title: truck hit a tree: 1 killed, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.