भरधाव ट्रकने सायकलस्वार युवकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:46 IST2021-01-23T16:30:05+5:302021-01-23T16:46:29+5:30
Accident News तवेज खान तमेज खान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

भरधाव ट्रकने सायकलस्वार युवकास चिरडले
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गाने हातगाव येथील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये मजूरांसाठी सायकलवरून जेवणाचे डब्बे घेऊन जाणाऱ्या जुनी वस्ती, रहेमत नगर परिसरातील २० वर्षीय युवकास ट्रकने चिरडल्याने तो जागेवरच ठार झाला. तवेज खान तमेज खान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे
हातगाव येथील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या सहमजूरांचे जेवणाचे डबे घेऊन जाण्यासाठी तवेज खान तमेज खान (२०) सायकलने घरी परत आला होता. सर्वांचे डबे गोळा करुन जेवणाचे डबे घेऊन तो दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास पुन्हा कामावर जाण्यासाठी निघाला असता राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ट्रक क्रमांक जीजे १९ एक्स ४०७६ ने चिरडले, तो मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रक सोडून ट्रक चालक पसार झाला, शहर पोलीसांनी ट्रक जप्त केला असून चालकाचा शोध घेणे सुरू आहे.