काटेपूर्णा नदीच्या पुलावरून ट्रक खाली कोसळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST2021-09-02T04:41:06+5:302021-09-02T04:41:06+5:30
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नदीच्या पुलावरून ट्रक ५० फूट खोल नदीपात्रात कोसळून ...

काटेपूर्णा नदीच्या पुलावरून ट्रक खाली कोसळला!
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नदीच्या पुलावरून ट्रक ५० फूट खोल नदीपात्रात कोसळून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी घडली.
अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक (एम.एच. २८ एबी ८४१४) हा नागपूर येथे माल घेऊन जात होता. राष्ट्रीय महामार्गावर काटेपूर्णा नदीच्या पुलावरून खड्ड्यांत ट्रक आदळल्याने वाहनचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक पुलावरून जवळपास ५० फूट खोल असलेल्या नदीपात्रात कोसळला. या अपघातात ट्रकचा चुराडा झाला असून, चालकशिवाजी किसन पवार व इम्रान बागवान दोघेही (रा. पागंरी, जि. बुलडाणा) गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, चंडिका माता आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ पाठविण्यासाठी मदत केली. ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल अरुण गोपनारायणासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.
___________________________