पुलावरु ट्रक नदीपात्रात पडला; दोन ठार

By Atul.jaiswal | Updated: August 17, 2017 12:56 IST2017-08-17T12:56:00+5:302017-08-17T12:56:25+5:30

truck colapse in river bed, two killed | पुलावरु ट्रक नदीपात्रात पडला; दोन ठार

पुलावरु ट्रक नदीपात्रात पडला; दोन ठार



बोरगांव मंजू (अकोला) : बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गवर काटेपूर्णा येथील पुलावरून मालवाहू ट्रक जवळपास 200 फूटा रुन नदी पात्रात खाली पडल्याने या मधे ट्रक मधील २ जन जागीच ठार झाले. पोलिस सूत्रानी दिलेल्या माहीती नुसार नाशिक येथून ट्रक क्रमाक एन एल_०२ एल ५९६७ हा ट्रक कांदा घेऊन कलकत्ता येथे जात असता बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दितील काटेपूर्णा जवळील मोठ्या पुलावरून पहाटे ४.३० वाजता नदी पात्रात पडला. त्यामुळे ट्रकचा चुराडा झाला असून, त्यामधे बसलेले ट्रक चालक दारासिंग राणा वय ५२, रा .दिल्ली ,आणि त्याचा सोबती निर्मलसिंग सुरजीत सिंग वय ५० .रा कलकत्ता दोघे जागीच ठार झाले.
दरम्यान, हे दोघे मूतक ह्या ट्रक मधे पूर्ण पने अड़कलेले असता त्याला बाहेर काढ़न्यासाठी बोरगांव मंजू पोलिस स्टेशन चे ठाणेदार पि.के.काटकर, पोलिस कर्मचारि कैलास गवई,सजंय तेलंग,सजंय इंगळे,शशिकात पाटिल, पुरुषोत्तम धांडे ,प्रकाश गवळी यांच्यासह मूर्तिजापुर येथील लकी अग्रवाल यांचे बचाव पथक यांनी शतीर्चे प्रयत्न केले आणि त्याच्या नातेवाईकाचा फोन द्वारे शोध घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला आणि मूर्तक यांना सर्वोपचार येथील शवविचेदनसाठी रवाना केले.

Web Title: truck colapse in river bed, two killed