गोवंशाची चामडी घेऊन जाणारा ट्रक पकडला!

By Admin | Updated: August 27, 2016 02:58 IST2016-08-27T02:58:04+5:302016-08-27T02:58:04+5:30

खामगाव यथील घटना; अकोल्यातील सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल.

A truck carrying cow dung caught! | गोवंशाची चामडी घेऊन जाणारा ट्रक पकडला!

गोवंशाची चामडी घेऊन जाणारा ट्रक पकडला!

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २६: शहरातून अकोल्याकडे गोवंशाची चामडी घेऊन जाणार्‍या ट्रकवर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारून ट्रकमधील ७३ हजार रूपये किंमतीची चामडी जप्त करुन सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
शहरातील शौकत कॉलनीमधून अवैधरित्या गोवंशाच्या चामडीची वाहतूक केल्या जात असल्याची माहिती गुरूवारी शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमएच३0-एल ४४९0 या क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यामधून गोवंशाच्या चामडीची वाहतूक केली जात असल्याचे आढळले.
गोवंशाची चामडी अंदाजे किंमत ७३ हजार रूपये व ट्रक साडेतीन लाख रूपये असा ४ लाख २३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अकोल्यातील अकोटफैल येथील रहिवाशी शे.इरफान शे.कादर, मो.हारूण मो.मोईल,फाकटपूरा येथील मो.अयुब शे.हुसेन, मो.खलील ट्रक चालक (रा.भारत नगर अकोला), मो.बिलाल कवंती अँन्ड कंपनीचा मालक अकोला, निसार अहमद अ. सादीक (हाजी नगर अकोट फैल अकोला) या सहा जणांविरूध्द शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गोवंश हत्या विरोधी कायदा ५ (अ) (ब) (क), ९, ९ (अ), सहकलम १८८, १0५, १७७ एमव्हीआर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी शे.इरफान शे.कादर, मो.हारूण मो.मोईल, मो.अयुब शे.हुसेन या तिघांना अटक करण्यात आली. तिघांना शुक्रवारी खामगाव न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: A truck carrying cow dung caught!