पातूर घाटात ट्रकची दुचाकीला धडक; दोन सख्खे भाऊ जागीच ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:06 PM2019-06-16T12:06:44+5:302019-06-16T12:08:52+5:30

वाशिम/ पातूर : रस्त्यावर सांडलेल्या आॅईलमुळे दुचाकी वाहन घसरून ट्रकच्या चाकाखाली सापडलेले दोन सख्खे भाऊ जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

Truck-bike accident in Patur Ghat; Two brothers killed on the spot! | पातूर घाटात ट्रकची दुचाकीला धडक; दोन सख्खे भाऊ जागीच ठार!

पातूर घाटात ट्रकची दुचाकीला धडक; दोन सख्खे भाऊ जागीच ठार!

Next
ठळक मुद्देभाऊ माणिक चव्हाण हे दोघे आणि आणखी एकजण दुचाकी वाहनाने कापशीकडे चालले होते. घाटातून जात असताना रस्त्यावर सांडलेल्या आॅईलवरून दुचाकी वाहन घसरून तिघेही खाली पडले.विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सुनील आणि माणिक चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ सापडल्याने दोघेही जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम/पातूर : रस्त्यावर सांडलेल्या आॅईलमुळे दुचाकी वाहन घसरून ट्रकच्या चाकाखाली सापडलेले दोन सख्खे भाऊ जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही ह्रदयद्रावक घटना रविवार, १६ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पातूरच्या घाटात घडली. दोन्ही मृतक मेडशी येथील असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतकांपैकी एक असलेल्या सुनील चव्हाण यांचा हात बधीर झाल्याने त्याची मालिश करण्यासाठी ते आणि त्यांचा भाऊ माणिक चव्हाण हे दोघे आणि आणखी एकजण दुचाकी वाहनाने कापशीकडे चालले होते. दुचाकी वाहन पातूरच्या घाटातून जात असताना रस्त्यावर सांडलेल्या आॅईलवरून दुचाकी वाहन घसरून तिघेही खाली पडले. दुदैर्वाने त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सुनील आणि माणिक चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ सापडल्याने दोघेही जागीच ठार झाले. या घटनेत दुचाकीवरील आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे चव्हाण कुटूंबियावर शोककळा पसरली असून मेडशी येथील गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Truck-bike accident in Patur Ghat; Two brothers killed on the spot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.