राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि ट्रेलरचा अपघात : ट्रकचालक ठार

By Admin | Updated: June 16, 2017 20:38 IST2017-06-16T20:38:46+5:302017-06-16T20:38:46+5:30

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील अनभोरा गावाजवळ ट्रक आणि ट्रेलर यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमध्ये ट्रकचालक ठार झाल्याची घटना १६ जूनचे दुपारी घडली.

Truck and trailer accident on national highway: Truck operator killed | राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि ट्रेलरचा अपघात : ट्रकचालक ठार

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि ट्रेलरचा अपघात : ट्रकचालक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील अनभोरा गावाजवळ ट्रक आणि ट्रेलर यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमध्ये ट्रकचालक ठार झाल्याची घटना आज १६ जूनचे दुपारी एक वाजताचे दरमयान घडली.
राष्ट्रीय महामार्गावरील अनभोरा गावाजवळ असलेल्या कुष्ठधाम येथे ट्रेलर क्र. सीजी ०४ एलसी ८२१८ चा चालक भरधाव वेगात एका ट्रकला ओव्हरटेक करीत असताना अमरावतीकडून मलकापुरकडे निघालेला ट्रक क्र. एम.एच. २७ ए ४८१८ ला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, ट्रकचालक अजहरअली गजफरअली रा. गुलीस्ता नगर अमरावती जागीच ठार झाला. सदर अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रेलर चालक नानकसिंग खरबडसिंग याचेविरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. कैलास कळमकर करीत आहेत.

Web Title: Truck and trailer accident on national highway: Truck operator killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.