पातूर घाटात ट्रकचा अपघात; चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 07:04 PM2020-08-18T19:04:35+5:302020-08-18T19:04:44+5:30

पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हसोबा घाट रोडवर भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने, ट्रक टेकडीवर जाऊन आदळला.

Truck accident in Pathur Ghat; The driver was killed on the spot | पातूर घाटात ट्रकचा अपघात; चालक जागीच ठार

पातूर घाटात ट्रकचा अपघात; चालक जागीच ठार

Next

पातूर : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हसोबा घाट रोडवर भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने, ट्रक टेकडीवर जाऊन आदळला. यात ट्रकचा चालक जागीच ठार झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला. १७ आॅगस्ट रोजी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घटना घडली.
चेन्नई येथून एमपी 0९-एचएच-९७३३ क्रमांकाचा ट्रक दगडी कडप्पा घेऊन अकोल्याकडे जात असताना, पातूर घाटात भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक घाटातील टेकडीवर जाऊन आदळला. यात ट्रकचालक मुबारक खान (रा. बहेदपूर) हा जागीच ठार झाला. ट्रकमधील क्लिनर धमेंद्र चौहान हा गंभीर जखमी झाला. येथील पत्रकार निशांत गवई, स्वप्निल सुरवाडे, दुले खा यांनी घटनास्थळावर पोहोचून जखमीला तत्काळ उपचारासाठी पातूर येथील प्राथमिक आरोग्य भरती केले. या ठिकाणी डॉ. चिराग रेवाले, परिचारिका गायकवाड यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले. घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार गजानन बायस, पोलीस कर्मचारी ससाणे, ठाकूर, जगदीश शिंदे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

Web Title: Truck accident in Pathur Ghat; The driver was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.