अकोल्यात तिहेरी हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 05:40 IST2018-05-18T05:40:27+5:302018-05-18T05:40:27+5:30

नांदायला येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या माथेफिरूने पत्नीसह सासरा व मेव्हण्याची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बाळापुरात बुधवारी मध्यरात्री घडली.

Tripura massacre in Akola | अकोल्यात तिहेरी हत्याकांड

अकोल्यात तिहेरी हत्याकांड

बाळापूर (जि. अकोला) : नांदायला येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या माथेफिरूने पत्नीसह सासरा व मेव्हण्याची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना बाळापुरात बुधवारी मध्यरात्री घडली. बार्शीटाकळी पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता एरंडा परंडा येथून या माथेफिरूला अटक केली.
सततच्या वादाला कंटाळून सै. फिरोज सै. रज्जाक याची पत्नी बाळापुरातील माहेरी राहात होती. पत्नी शबाना परवीनला घेण्यासाठी फिरोज बाळापूर येथे आला होता. मात्र शबानाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यातून त्यांच्यात झालेला वाद सासरे शे. महेबूब अ. रसुल यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या फिरोजने पत्नी शबाना आणि महेबूब यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मेव्हणा सै. फिरोज शे. महेबूब घटनास्थळावर पोहोचताच आरोपीने त्याच्यावरही वार केला.
>जामिनावर सुटून हत्याकांड
आरोपी सै. फिरोज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पत्नीला मारहाण केल्याप्रकरणीही त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४नुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात बाळापूर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटून आरोपीने हे हत्याकांड घडवले.

Web Title: Tripura massacre in Akola