बाळापूर : माहेरवरून १ लाख रुपये आणण्याची मागणी करून विवाहितेला शारीरिक, मानसिक छळ करून ३ तलाक देणाºया पतीसह सासरच्यांविरुद्ध २० जानेवारी रोजी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बाळापूर येथील सलमा परवीन शोएब खा यांचा शोएब खान शकील खान याच्याबरोबर १० मार्च २०१९ रोजी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. काही दिवसात पती, सासू, सासरे व दोन नणंद यांनी माहेरून १ लाख रुपये व रंगीत टीव्हीची मागणी करून छळ सुरू केला. याबाबत १३ सप्टेंबर रोजी बाळापूर पोलीस स्टेशनला शारीरिक, मानसिक त्रासाबाबत तक्रार दिली. तसेच १५ सप्टेंबर रोजी पुन्हा तक्रार दिली. ही तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर १९ जानेवारी २०२० रोजी बाळापूर येथील कालेखानी पुरा येथे पती व सासरचे मंडळी येऊन त्यांनी विवाहितेला ३ वेळा तलाक देऊन फारकत दिल्याचे सांगितले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी पती शोएब खान शकील खान, सासरे शकील खान सुजात खान, सासू कौसरबी शकील खान, नणंद नुसरत परवीन राजीक, नेहा परवीन जफर खान यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ, ३२३, ५०६,३४ व मुस्लीम महिला हक्क संरक्षण कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
तीन तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 14:09 IST