ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:18+5:302021-03-20T04:17:18+5:30

अकोला शहरातून मुंबईसह सुरत, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नाशिक या लांब पल्ल्याच्या तसेच अमरावती, वर्धा, जळगाव, खान्देश या शहरांसाठी ...

Travels wheel punctured again! | ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर !

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर !

अकोला शहरातून मुंबईसह सुरत, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नाशिक या लांब पल्ल्याच्या तसेच अमरावती, वर्धा, जळगाव, खान्देश या शहरांसाठी वातानुकूलित आणि साध्या ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणावर सुटतात. शहरातून दररोज सुमारे ३५ ते ४० ट्रॅव्हल्स सुटत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी हा व्यवसाय तेजीत होता. मात्र, लॉकडाऊनपासून या व्यवसायावर अवकळा आली आहे. यंदा पुन्हा १५ फेब्रुवारीपासून लॉकडाऊन लागू झाले. प्रवाशांची संख्या घटली. प्रशासनाने ५० टक्के प्रवासी घेऊन वाहने चालविण्याची परवानगी दिली. मात्र, खर्च परवडत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी फेऱ्या बंद व कमी केल्या. अनेकजण नाईलाजाने कमी प्रवासी घेऊन सेवा देत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स वाहतूकदार चिंतेत पडले आहेत.

--बॉक्स--

गाडी रूळावर येत होती पण...

जवळपास नऊ महिने सर्व व्यवसाय थांबल्यानंतर हळूहळू पुन्हा व्यवसाय रूळावर येत होते. ट्रॅव्हल्स ५० टक्के क्षमतेने धावू लागल्या होत्या. आता पुन्हा रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. ट्रॅव्हल्स बंद ठेवाव्या लागत आहेत.

--कोट--

प्रवासी गाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक ट्रॅव्हल्स उभ्या आहेत. त्यात सॅनिटायझेशनचा खर्च वाढला आहे.

विनोद जकाते, ट्रॅव्हल्स मालक

--कोट--

ऐन लग्नसराई व होळीसारख्या सणाच्या काळात कोरोना वाढल्याने व्यवसाय ठप्प पडला आहे. प्रवाशांची संख्याही रोडावली आहे. डिझेलचा खर्च काढणे कठीण झाले आहे.

प्रकाश डुकरे, ट्रॅव्हल्स मालक

--कोट--

प्रवासी येत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, टॅक्स कसा भरायचा, असा प्रश्न समोर आहे. नाईलाजास्तव गाडी बंद ठेवावी लागत आहे.

महेश बोकाडे, ट्रॅव्हल्स मालक

--बॉक्स--

रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या

४०

सध्याची संख्या

१५ ते १७

Web Title: Travels wheel punctured again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.