‘व्हायरस गँग’ पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: September 19, 2014 00:44 IST2014-09-19T00:44:25+5:302014-09-19T00:44:25+5:30
खामगाव पोलिसांची कारवाई, तीन दुचाकींसह लॅपटॉप व मोबाईल जप्त.

‘व्हायरस गँग’ पोलिसांच्या जाळ्यात
खामगाव : शहरातील एकाचा लॅपटॉप चोरीस गेल्यानंतर पोलिसांनी तपास केला. बालगुन्हेगारांचा समावेश असलेली शहरातील व्हायरस गॅग काल रात्री पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या गँगमधील ६ चोरट्यांकडून पोलिसांनी ३ दुचाकी, लॅपटॉप तसेच मोबाईल जप्त केले आहेत; तसेच आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता ठाणेदार दिलीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक सिंधी कॉलनीमधील राजेश भोजवाणी यांचा लॅपटॉप चोरी गेला होता. याबाबत त्यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. या चोरीचा उपविभागीय पोलिस अधिकारी जी.श्रीधर व ठाणेदार दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला असता काल रात्री पोलिसांनी शहरातील गोपाळ नगर व चांदमारी भागातील ६ अल्पवयीन मुलांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता या मुलांची ह्यव्हायरस गँगह्ण असून, या गँगकडून चोरीच्या घटना उघड झाल्या. यावरुन पोलिसांनी ओम शर्मा यांची चोरीस गेलेल्या दुचाकीसह आणखी एक दुचाकी, लॅपटॉप, तसेच मोबाईल जप्त केले. तसेच तपासकामी पोलिसांचे पथक शेगाव व आकोट येथे रवाना झाले आहे.