मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 11:13 AM2019-12-02T11:13:21+5:302019-12-02T11:13:48+5:30

विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Transport of human waste from laborers | मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : बाळापूर नगरपालिकेकडे मलनिस्सारण यंत्र नसल्याने शौचालयांचे टाके खाली करण्यासाठी मजुरांकडून मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून न्यावी लागत आहे. ही विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बाळापूर नगर परिषदेने २00२ मध्ये ट्रॅक्टर सोबतच व्हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र आणले; परंतु त्याचा एकदाही उपयोग न झाल्याने लाखो रुपयांचे महत्त्वाचे उपकरण वापरात नाही. त्यामुळे, शहरातील शौचालयांचे टाके उपसण्यासाठी मजुरांना जुंपून टोपल्याद्वारे मानवी विष्ठेची वाहतूक करावी लागत आहे. ही विष्ठा नदी काठावर फेकण्यात येत असल्याने परिसर व नदीचे प्रदूषण होत आहे. शासन एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून परिसर स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करते; मात्र नगर परिषद प्रशासन शहरातील सर्व घनकचरा नदीकाठावरच टाकत असल्याचे चित्र आहे. या कचऱ्यावरच मानवी विष्ठा फेकण्यात येत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.
शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देऊन घरोघरी शौचालयांची निर्मिती केली आहे. सेफ्टिक शौचालयांचे टाके लवकरच भरत आहेत. हे टाके खाली करण्यासाठी नगर परिषदेकडे हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र नसल्याने मजुरांच्या माध्यमातून ते खाली करण्यात येतात. हे टाके खाली करण्यासाठी मजूर हातगाडी किंवा जवळ असल्यास डोक्यावर टोपल्यात भरून त्याची वाहतूक करीत आहेत. ही विष्ठा नदीच्या काठावरच टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  

५५ हजार लोकसंख्येच्या शहरात व्हॅॅक्युम एमटीआर यंत्र नसल्याने नदी काठावर मानवी विष्ठा टाकण्याचे काम माणसाकडून करून घेणे हा गुन्हा आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन प्रदूषण करीत असलेल्या नगरपालिकेवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून नेणे चुकीचे आहे. यावर कडक कारवाई व्हावी.
- रमेश लोहकरे,
जिल्हा भाजपा सचिव,
बाळापूर


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेचे व्हॅक्युम एमटीआर यंत्र नादुरुस्त आहे. त्याचा वापर नसल्याने खराब झाले. शहरातील टाके साफ करण्यासाठी बाहेरून ट्रॅक्टरचे व्हॅक्युम एमटीआर बोलविण्यासाठी नागरिकांना सूचना केल्या. नवीन व्हॅक्युम एमटीआर यंत्र बोलविण्यासाठी सभागृहात चर्चा करून नवीन यंत्र घेण्याची तरतूद करू. नागरिकांनी टाके साफ करण्यासाठी मानवाऐवजी यंत्राचा वापर करावा.
- जी.एस. पवार,
न.प. मुख्याधिकारी, बाळापूर

Web Title: Transport of human waste from laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.