पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली; श्रीधर जी. नवे पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:06 IST2020-06-26T18:06:14+5:302020-06-26T18:06:44+5:30
अमोघ गावकर यांनी अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली देण्यात आली.

पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली; श्रीधर जी. नवे पोलीस अधीक्षक
अकोला : अकोल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी श्रीधर जी. हे अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक असणार आहेत. अमोघ गावकर यांनी अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली देण्यात आली असून, त्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले. राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. ४ नागपूरचे समादेशक श्रीधर जी. यांना अकोल्याच्या पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.