टोइंग पथकाने उचलल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्या

By admin | Published: July 7, 2017 01:40 AM2017-07-07T01:40:57+5:302017-07-07T01:40:57+5:30

रेल्वे स्थानक : शाब्दीक चकमकीनंतर खाली उतरवल्या गाड्या

Trains of BJP office bearers picked up by toying squad | टोइंग पथकाने उचलल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्या

टोइंग पथकाने उचलल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रेल्वे स्थानकावर खासदार संजय धोत्रे हे प्रवाशांचा जनता दरबार घेत असताना टोइंग पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मोटारसायकली उचलल्या. गाड्या खाली उतरवण्याच्या मुद्यावरून कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी केली. खासदार, आमदार आणि महापौरांसमोर कंत्राटदाराची माणसे आणि ट्रॅफिक पोलिसांनी नियम धाब्यावर बसविल्याने येथे वीस मिनिटे शाब्दीक चकमक झाली. कारवाई फसल्याची जाणीव टोइंग पथकाला झाल्याने त्यांनी जप्त केलेल्या सर्व गाड्या खाली उतरवल्या. या निमित्ताने सत्तापक्षातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना टोइंग पथकाची किती दादागिरी आहे याचा अनुभव गुरुवारी आला.
रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदारांनी गुरूवारी प्रवाशांच्या समस्या जाणनू घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी भाजपामधील अनेक पदाधिकारी रेल्वे स्थानकावर जमले होते. या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मोटारसायकली स्थानकाच्या समोरच्या बाजूला ठेवल्या होत्या. भाजप पदाधिकारी रेल्वे स्थानकाची पाहणी करीत खासदारांसमवेत रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या दादऱ्यावरून उतरून खाली आले. तेवढ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना टोइंग पथक गाड्या उचलताना दिसलेत. पदाधिकाऱ्यांच्या गाड्या उचलून एमएच ३० एबी ३४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकल्या जात असल्याचे पाहून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कारवाई थांबविण्याचे सांगितले. मात्र, ट्रकमध्ये बसलेल्या ट्रॅफिक पोलिसासह कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी करत दूचाकी उचलण्याचा प्रकार सुूरच ठेवला. हा सर्व प्रकार खासदार, आमदार, महापौर आणि पदाधिकाऱ्यांसमोर घडत होता. कंत्राटदाराची माणसांसोबतची वादावादी वाढल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार थांबविला व सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या खाली उतरवण्यात आल्या.

‘जीआरपीएफ’च्या हद्दीत शहर वाहतूक शाखा कशी?
अकोला रेल्वे स्थानक परिसरातून मोटारसायकल चोरीला गेली, तर शहरातील पोलीस विभाग आपल्या ठाण्याची हद्द दाखवून तक्रार स्वीकारत नाहीत. तेव्हा सीमेचा नियम दिसतो आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस टोइंग पथकाला घेऊन जेव्हा हे पोलिस रेल्वेस्थानक परिसरातील मोटारसायकली उचलतात, तेव्हा नियम कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक शाखा- महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात होणारी टोइंग पथकाची दादागिरी वाहतूक नियंत्रणापेक्षा अकोलेकरांना बळजबरी लुटणारीच सिद्ध होत असतानादेखील येथील लोकप्रतिनिधी त्याबद्दल ब्र शब्द काढत नाहीत, याचे नवल वाटते.

Web Title: Trains of BJP office bearers picked up by toying squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.