नाताळाला गोव्यासाठी अकोल्यातूनच गाडी, नागपूर - मडगाव एक्स्प्रेसला मार्चपर्यंत मुदतवाढ

By Atul.jaiswal | Published: December 21, 2023 01:34 PM2023-12-21T13:34:55+5:302023-12-21T13:35:10+5:30

आगामी नाताळ व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Train from Akola to Goa for Christmas, Nagpur - Madgaon Express extended till March | नाताळाला गोव्यासाठी अकोल्यातूनच गाडी, नागपूर - मडगाव एक्स्प्रेसला मार्चपर्यंत मुदतवाढ

नाताळाला गोव्यासाठी अकोल्यातूनच गाडी, नागपूर - मडगाव एक्स्प्रेसला मार्चपर्यंत मुदतवाढ

अकोला : आगामी नाताळ व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अकोलामार्गे धावणाऱ्या नागपूर - मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेससह पाच विशेष रेल्वे गाड्यांचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११३९ नागपूर - मडगाव विशेष आता ३० मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११४० मडगाव - नागपूर विशेष ३१ मार्चपर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ०१४३९ पुणे - अमरावती द्विसाप्ताहिक विशेष आता ३१ मार्च २०२४ पर्यंत, तर ०१४४० अमरावती - पुणे विशेष १ एप्रिल २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्याही अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर विशेष आता १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, ०२१४० नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

०२१४४ नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, तर ०२१४३ पुणे - नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १७ फेब्रुवारी २०२४पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण १४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

बडनेरा - नाशिक - बडनेरा मेमूच्या १८२ फेऱ्या वाढल्या

बडनेरा ते नाशिक या दोन स्थानकांदरम्यान धावणऱ्या बडनेरा - नाशिक - बडनेरा विशेष मेमूच्या १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत १८२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेल्या ०१२११ बडनेरा - नाशिक विशेष गाडीला ३१ मार्च २०२४ पर्यंत, तर ०१२१२ नाशिक - बडनेरा विशेष गाडीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: Train from Akola to Goa for Christmas, Nagpur - Madgaon Express extended till March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.