बेशिस्त वाहनामुळे वाहतुकीस खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST2020-12-08T04:16:40+5:302020-12-08T04:16:40+5:30

अवैध व्यवसायाचा सुळसुळाट बाळापूर: बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त असल्याने बाळापूर पोलीस ...

Traffic jams due to unruly vehicles | बेशिस्त वाहनामुळे वाहतुकीस खोळंबा

बेशिस्त वाहनामुळे वाहतुकीस खोळंबा

अवैध व्यवसायाचा सुळसुळाट

बाळापूर: बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त असल्याने बाळापूर पोलीस स्टेशन परिसरात अवैध व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे. अवैध व्यवसाय वरली सट्टा, पत्ते, जुगार सुरू आहेत. अवैध दारू गावोगाव विकली जात आहे. अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. या व्यवसायांवर पोलिसांचा कुठलाही अंकुश नाही

वन्य प्राण्याच्या त्रासाने शेतकरी त्रस्त

बाळापूर: वन्य प्राण्याच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतात गहू, हरभरा पिकांत हरीण, रानडुक्कर, वानर धुडगूस घालत आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीपिकांची नासाडी करीत आहेत. शेतातील पिके खराब होत आहेत. वनविभागाने या प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Traffic jams due to unruly vehicles