वाडेगाव बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:31+5:302021-06-17T04:14:31+5:30

बाळापूर पातूर मार्ग नांदेड ते हैदराबाद जोडणारा असल्याने जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, तसेच बाळापूर तालुक्यातील ...

Traffic jam in Wadegaon bus stand area | वाडेगाव बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

वाडेगाव बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

बाळापूर पातूर मार्ग नांदेड ते हैदराबाद जोडणारा असल्याने जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, तसेच बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बाजारपेठ मोठी असल्याने, येथील बस स्थानक परिसरात सतत वाहनांची वर्दळ असते, परंतु एकीकडे वाहन चालकांवर नियंत्रण दिसत नाही, तर दुसरीकडे बस स्थानक परिसरात व्यावसायिकांचे दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मार्ग काढताना, कसरत करावी लागत आहे. वाहतूककोंडीच्या या गंभीर समस्येमुळे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अगोदरच पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या रस्त्यावर होत असलेली वाहतुकीची कोंडी नेहमीचीच आहे. पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करून, वाहतूककोंडी सोडविण्याची मागणी ग्रामस्थ उमेश वानखडे, विकी जंजाळ यांनी केली आहे.

फोटो:

Web Title: Traffic jam in Wadegaon bus stand area