रतनलाल प्लॉट चौकात वाहुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:23 IST2021-06-09T04:23:20+5:302021-06-09T04:23:20+5:30

बाळापूर रोडवरील मुख्य नाल्याचे बांधकाम अकाेला: जुने शहरातील बाळापूर रोड लगत असलेल्या मुख्य नाल्याच्या बांंधकामास गत काही दिवसांपासून सुरुवात ...

Traffic jam at Ratanlal Plot Chowk | रतनलाल प्लॉट चौकात वाहुकीची कोंडी

रतनलाल प्लॉट चौकात वाहुकीची कोंडी

बाळापूर रोडवरील मुख्य नाल्याचे बांधकाम

अकाेला: जुने शहरातील बाळापूर रोड लगत असलेल्या मुख्य नाल्याच्या बांंधकामास गत काही दिवसांपासून सुरुवात करण्यात आली. या कामाला वेग आला आहे. मुख्य नाल्याच्या बांधकामामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचा धाेका कमी होणार आहे.

सफाई कामगारांची तीन हजार पदे निर्माण करा

अकोला: महापालिकेचे वाढीव क्षेत्र, तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिका क्षेत्रात सफाई कामगारांची तीन हजार पदे निर्माण करा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसतर्फे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदनाद्वारे केली.

नाल्यांमध्ये फवारणीला सुरुवात

अकोला: जुने शहरातील नाल्यांमध्ये सांडपाणी साचून असून या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया सदृश्य आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जुने शहरातील नाल्यांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी फवारणी करण्यात आली आहे.

लसीची प्रतीक्षा संपली

अकोला: मे महिन्यात सुरू झालेली १८ ते ४५ वयोगटासाठीची लसीकरण मोहीम काही दिवसांतच बंद पडली. त्यामुळे तरुणाईला अनेक दिवसांपासून लसीची प्रतीक्षा होती, मात्र ही प्रतीक्षा आता संपली असून, येत्या २१ जुनपासून या वयोगटासाठी लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

Web Title: Traffic jam at Ratanlal Plot Chowk