रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
By Admin | Updated: May 31, 2014 21:55 IST2014-05-31T19:12:32+5:302014-05-31T21:55:10+5:30
पातूर तालुक्यातील वाडेगाव मार्गावर बाभळीचे झाड कोसळल्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
दिग्रस बु. - पातूर तालुक्यातील दिग्रस बु. ते वाडेगाव या वर्दळीच्या मार्गावर शुक्रवारी सकाळी बाभळीचे झाड कोसळल्यामुळे तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
दिग्रस बु. ते वाडेगाव या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्याच्या दुतर्फा निंब व बाभळीचे मोठ-मोठे वृक्ष आहेत. यातील अनेक वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत तर अनेक झाडे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे या मार्गावर वृक्ष उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून पडण्याचे प्रकार नेहमीच पहायला मिळतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शुक्रवारी सकाळी या रस्त्यावर बाभळीचे एक मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अखेर परिसरातील शेतकरी व एस.टी.च्या चालक-वाहकांनी पडलेले झाड तोडून बाजूला केले. त्यानंतर मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली. संबंधित विभागाने या मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.