नाग, मुंगसाच्या झुंजीमुळे वाहतूक विस्कळीत
By Admin | Updated: July 26, 2014 21:04 IST2014-07-26T21:04:48+5:302014-07-26T21:04:48+5:30
नाग आणि मुंगसाची झुंज रंगल्यामुळे बघ्यांची गर्दी होऊन रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

नाग, मुंगसाच्या झुंजीमुळे वाहतूक विस्कळीत
महान: बाश्रीटाकळी तालुक्यातील पिंजर-महान रस्त्यावर गुरुवार २४ जुलै रोजी नाग आणि मुंगसाची झुंज रंगल्यामुळे बघ्यांची गर्दी होऊन रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. साप आणि मुंगसाचे वैर असल्याचे सर्वश्रुत आहे. याचा प्रत्यय गुरुवारी महान परिसरातील लोकांना आला. महान शेतशिवारात पिंजर-महान रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी ५.00 वाजताच्या सुमारास नाग आणि मुंगसाची झुंज रंगली होती. येणार्या जाणार्या लोकांच्या नजरेस ते दृष्य पडल्याने तेथे बघ्यांची गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत झाली. मुंगसापासून जीव वाचविण्यासाठी नाग भर रस्त्यावर येऊन थांबल्याने वाहतुकीला अधिकच अडथळा निर्माण झाला होता. तर लोकांच्या गर्दीमुळे मुंगसाने नागाला सोडून रस्त्याला लागूनच असलेल्या आंब्याच्या झाडातील भगदाडात आधार घेतला होता.