विविध गावांमध्ये शौचालय, स्वच्छता तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 15:40 IST2020-03-01T15:40:09+5:302020-03-01T15:40:35+5:30

दापुरा, निबोळी, नर्सिपूर, थार, बेलखेड, मनात्री व हिवरखेड येथे भेटी देण्यात आल्या.

Toilets, sanitary inspection in various villages | विविध गावांमध्ये शौचालय, स्वच्छता तपासणी

विविध गावांमध्ये शौचालय, स्वच्छता तपासणी

अकोला : जिल्ह्यातील शौचालय बांधकाम व शाश्वत स्वच्छतेविषयक कामांची तपासणी विविध गावांमध्ये गत दोन दिवसांत पथकाद्वारे करण्यात आली. त्यामध्ये बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
शेयरिंग वैयक्तिक शौचालय बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे सांगितले. शौचालय बांधकामासाठी गवंडी यांना तांत्रिक माहिती देण्यात आली. बांधकाम पाहणी करण्यात आली. जैविक व रासायनिक पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविणे, याबाबत जलसुरक्षक यांना सांगण्यात आले. टप्पा क्रमांक २ नुसार ग्रामपंचायत पडताळणी व ग्रामपंचायत शाश्वत स्वच्छता आराखडा तयार करून सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले. यावेळी पंचायत समिती बार्शीटाकळी व पातूरमधील ग्रामपंचायत पुनोती बु., बोरमळी शेलगाव, चान्नी, आसोला या गावांमध्ये तर पंचायत समिती तेल्हारा अंतर्गत ग्रामपंचायत दापुरा, निबोळी, नर्सिपूर, थार, बेलखेड, मनात्री व हिवरखेड येथे भेटी देण्यात आल्या.
यावेळी विस्तार अधिकारी पंचायत अनंत लव्हाळे व समूह समन्वयक सतीश ठोंबरे, जिल्हा पथकाचे शाहू भगत, राहुल गोडले, राजेश डहाके, प्रवीण पाचपोर, रोशन डामरे, सागर टाकळे, शिव उन्हाळे व प्रशांत दोडेवार सहभागी होते.

 

Web Title: Toilets, sanitary inspection in various villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.