राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

By Admin | Updated: March 12, 2016 02:31 IST2016-03-12T02:31:12+5:302016-03-12T02:31:12+5:30

बुलडाणा येथे संत चोखामेळा साहित्य परिसर सज्ज

Today's inauguration of state-level BalKumar YuvaSahitya Sammelan | राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

बुलडाणा : शहरात पहिल्या राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे उद्घाटन १२ मार्च रोजी सकाळी १0.३0 वाजता होईल.
येथील गर्दे वाचनालयाच्या संत चोखामेळा सािहत्य परिसरात ख्यातनाम प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन कवी तथा गीतकार प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
येथील प्रगती वाचनालयाच्या पुढाकाराने तथा महाराष्ट्र राज्य सािहत्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने १२ व १३ मार्च असे दोन दिवस चालणार्‍या संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हािधकारी डॉ. विजय झाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ग्रंथदिंडी, विविध विषयांवर परिसंवाद, मुशायरा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर दुसर्‍या दिवशी राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार युवा कविसंमेलन, ११ ते १ या वेळेत आरोपीच्या पिंजर्‍यात हे अभिरूप न्यायालयाचा कार्यक्रम होईल.

Web Title: Today's inauguration of state-level BalKumar YuvaSahitya Sammelan