थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागितली!

By Admin | Updated: June 16, 2017 00:49 IST2017-06-16T00:49:52+5:302017-06-16T00:49:52+5:30

दोन दिवसात माहिती सादर करा : ‘डीडीआर’चे बँकांना निर्देश

Tired borrowers asked for information! | थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागितली!

थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागितली!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर शासनाच्या सहकार खात्यामार्फत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागितली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी (डीडीआर) बुधवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना दिले.
राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर गत ३१ मार्च २०१६, ३० जून २०१६ आणि ३१ मार्च २०१७ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचा आदेश राज्याच्या सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकांना दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक जी.जी.मावळे यांनी बुधवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांना दिले. बँकांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

थकबाकीदार शेतकऱ्यांना १० रुपयांपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे निर्देश!
थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे निर्देश शासनामार्फत बँकांना देण्यात आले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करून, जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिब्ांधकांनी गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना दिले.

सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आली, तसेच शासनाच्या निर्देशानुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे निर्देशही बँकांना दिले.
- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक

Web Title: Tired borrowers asked for information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.