आकोली जहागीर परिसरात वादळाचे थैमान
By Admin | Updated: June 3, 2014 01:53 IST2014-06-02T22:19:42+5:302014-06-03T01:53:55+5:30
आकोट तालुक्यातील आकोली जहागीर परिसरात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळाने थैमान घातले. परिसरातील केळी पीक जमीनदोस्त झाले व अनेक झाडांची पडझड झाली असून, काही घरांवरील टिनपत्रे उडाली. दिवठाणा शिवारात गट नं. ६४ मध्ये विठ्ठल मुरलीधर उकहकार या शेतकर्याच्या शेतामधील दोन एकरातील केळी पीक जमीनदोस्त झाले आहे. काही शेतातील वीज खांब पडले, तर अनेक शेतातील लिंबाच्या झाडावरील लिंबू पडले आहेत. वादळातील प्रचंड नुकसानीमुळे या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. (वार्ताहर)

आकोली जहागीर परिसरात वादळाचे थैमान
आकोली जहागीर : आकोट तालुक्यातील आकोली जहागीर परिसरात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळाने थैमान घातले. परिसरातील केळी पीक जमीनदोस्त झाले व अनेक झाडांची पडझड झाली असून, काही घरांवरील टिनपत्रे उडाली. दिवठाणा शिवारात गट नं. ६४ मध्ये विठ्ठल मुरलीधर उकहकार या शेतकर्याच्या शेतामधील दोन एकरातील केळी पीक जमीनदोस्त झाले आहे. काही शेतातील वीज खांब पडले, तर अनेक शेतातील लिंबाच्या झाडावरील लिंबू पडले आहेत. वादळातील प्रचंड नुकसानीमुळे या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.