ठगबाज वासनकरांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

By Admin | Updated: August 15, 2014 01:23 IST2014-08-15T01:20:36+5:302014-08-15T01:23:03+5:30

आमिष दाखवून अकोल्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणार्‍यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी.

Thugaban Vasankar police custody till Monday | ठगबाज वासनकरांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

ठगबाज वासनकरांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

अकोला : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणार्‍या वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रबंध संचालक प्रशांत वासनकर व त्याच्या दोन साथीदारांना गुरुवारी न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींना बुधवारी सिव्हिल लाईन्स पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले होते.
नागपूरमधील शिवाजीनगर येथील वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी कंपनीचे प्रशांत जयदेव वासनकर (४२), अभिजित चौधरी व विथिला विनय वासनकर यांनी गुंतवणूकदारांना दुप्पट रक्कम आणि व्याज देण्याची आमिषं दाखवून अनेकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. यामध्ये अकोल्यातील अरुण साहेबराव देशमुख यांचा समावेश आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी कंपनीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.याप्रकरणी देशमुख यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत वासनकर, विथिला वासनकर, विनय जयदेव वासनकर, अभिजित जयंत चौधरी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Thugaban Vasankar police custody till Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.