अश्लील चाळे करताना तीन युवक ताब्यात
By Admin | Updated: July 20, 2014 02:01 IST2014-07-20T01:51:35+5:302014-07-20T02:01:09+5:30
अकोला बसस्थानकासमोरील गांधी जवाहर बागेमध्ये तीन युवतींसोबत अश्लील चाळे करणार्या तिघांना ऑल वुमन मोबाईल पथकाने ताब्यात घेतले.

अश्लील चाळे करताना तीन युवक ताब्यात
अश्लील चाळे करताना तीन युवक ताब्यात
अकोला : बसस्थानकासमोरील गांधी जवाहर बागेमध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास तीन युवतींसोबत अश्लील चाळे करणार्या तिघांना ऑल वुमन मोबाईल पथकाने ताब्यात घेतले. या तिघांपैकी एक अल्पवयीन मुलगा आहे. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर सोडून दिले.
गांधी-जवाहर बागेमध्ये तीन युवती व तीन युवक अश्लील चाळे करीत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांना मिळाली. त्यांनी पथकासह गांधी- जवाहर बागेची पाहणी केली असता, गोरेगाव येथे राहणारा दशरथ महादेव सोळंके (१८), शेगाव येथील विलास मधुकर सरदार (२३) आणि एक १७ वर्षीय मुलगा तीन महाविद्यालयीन युवतींसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी युवती व युवकांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात आणले. आई-वडिलांना बोलावून युवतींना त्यांच्या ताब्यात दिले. तिघा मुलांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.