शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या हल्ल्यात तीन विद्यार्थी जखमी, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:58 IST

तेल्हारा : शहरात काही माकडांनी केलेल्या हल्ल्यात तीन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. यापैकी एक गंभीर झाला. तेल्हारा तालुक्यासह शहरात माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

ठळक मुद्देघटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडलीमाकडांचा हैदोस; नागरिक त्रस्तमाकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शहरात काही माकडांनी केलेल्या हल्ल्यात तीन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. यापैकी एक गंभीर झाला. तेल्हारा तालुक्यासह शहरात माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. माकडांच्या हल्ल्यात बेलखेड येथील महिलेला जीव गमवावा लागला, तर कित्येक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सोमवारी पुन्हा माकडांनी शहरात हैदास घातला. सेठ बन्सीधर विद्यालयात शिक्षण घेत असलेले राहुल नारायण सुईवाल (१६), राम गजानन कवळे (१७), नासीद सयद निसार (१७) हे तिघे दुपारच्या सुट्टीनंतर शाळेमध्ये जात असताना त्यांच्यावर माकडाने अचानक हल्ला चढवला. यामध्ये राहुल सुईवाल हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अकोला सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. माकडांच्या अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Telharaतेल्हाराMonkeyमाकडStudentविद्यार्थी