ऑटो-दुचाकी अपघातात तीन जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 17:23 IST2020-10-13T17:22:56+5:302020-10-13T17:23:05+5:30
Accident, Murtizapur ऑटो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.

ऑटो-दुचाकी अपघातात तीन जण गंभीर
मूर्तिजापूर : दर्यापूर रोडवर सिरसो पुंडलिक नगर जवळ ऑटो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना १३ आक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता घडली.
दुचाकीवर सागर गवई (२२) व गोविंद प्रजापती (२२) दोघेही राहणार दर्यापूर हे आपल्या एमएच २७ बीएन ५५७२ या क्रमांकाच्या दुचाकीने दर्यापूरकडे जात होते व विरूद्ध दिशेने प्रवासी मजूरांना घेऊन येत असलेल्या ऑटोची समोरासमोर धडक झाली. या धडकेत अॅटोतील प्रवाशी आकाश सुरेश मेश्राम (२२) राहणार लकडगंज मूर्तिजापूर हा गंभीर जखमी झाला. दुचाकी व ऑटोतील गंभीर जखमी प्रवाशी या तिघांचाही एक एक पाय निकामी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिका चालक अमोल खंडारे यांनी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.