बर्ड फ्लू रोखण्यासाठी बार्शिटाकळीत तीन ऑपरेशन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:40+5:302021-02-05T06:19:40+5:30
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूची भीती ...

बर्ड फ्लू रोखण्यासाठी बार्शिटाकळीत तीन ऑपरेशन!
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूची भीती निर्माण झाली. परिस्थिती पाहून पशुसंवर्धन विभागही सतर्क झाला. दरम्यान, बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे गावात बर्ड फ्लूमुळे कोंबडीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्यानुसार, पिंपगळाव चांभारे येथे ० ते १ किलोमीटर परिसरात कलिंग ऑपरेशन, मॅपिंग आणि कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनच्या माध्यमातून बर्ड फ्लूच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये, या अनुषंगाने परिसरातील धोकादायक कोंबड्या किल्ड (मारण्यात आल्या) करण्यात आल्या. तसेच परिसरातील गावातदेखील आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या शिवाय पुढील दहा किलोमीटर परिसरात सर्वेक्षण कार्य सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.
सॅनिटायझेशनचे ऑपरेशन आज
बर्ड फ्लूचा धोका पाहता जिल्ह्यात तालुकास्तरावर विशेष समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या निमित्यांमार्फत जनजागृती केली जात आहे. तसेच पिंपळगाव चांभारे गावात शुक्रवारी सॅनिटायझेशन ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागातर्फे तयारी करण्यात आली आहे.
यांनी घ्यावी काळजी
कोंबड्यांसह इतर पक्ष्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मास्कचा वापर करावा, नियमित साबणाने हात धुवावे.
ज्या ठिकाणी पक्षी ठेवण्यात आले, अशा ठिकाणांसह परिसर निर्जंतुकीकरण करावा.
बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली आहे. दरम्यान, पिंपळगाव परिसरात राबविण्यात आलेल्या विविध ऑपरेशनदरम्यान ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला