महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात आणखी तिघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 13:46 IST2019-05-04T13:46:19+5:302019-05-04T13:46:24+5:30
या प्रकरणात दोन आरोपींना बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी

महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात आणखी तिघे गजाआड
अकोला: येवता ते मलकापूर रोडवरील एका कोरड्या खदानीत शहरातील एका ४५ वर्षीय महिलेवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली होती. या प्रकरणात दोन आरोपींना बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांची ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
एमआयडीसी परिसरात एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकाचे ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे दोघेही कैलास नगरात एकत्र राहत होते. त्यांच्या नातेसंबंधाला युवकाच्या नातेवाइकांचा विरोध होता; मात्र हा विरोध झुगारून ते एकत्र राहात होते. युवकाच्या मोठ्या भावाने दोघांनाही घरी चला अशी भूलथाप दिली आणि बुधवारी महिलेला त्याच्या घरी नेण्यासाठी आला. यावेळी त्याच्या सोबत तीन ते चार मित्रही होते. महिलेला घराकडे घेऊन जात असतानाच ते येवता-मलकापूर रोडवरील अंधारातील एका खदानजवळ पाच जणांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मनोज राऊत (२२), आकाश दत्ता (२३) यांना बुधवारी रात्रीच अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी शिवणीतील बहुजन नगरात राहणारे सुनील अभ्यंकर (४३), आकाश खंडारे (२४), गजानन कांबळे (३८) यांना अटक केली. तिघा आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी)